पुणे : आखाड साजरा होणार...


अखेर आखाड साजरा करता येणार...

PRESS MEDIA LIVE  : पुणे : मोहम्मद जावेद  मौला.

पुणे – गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला लॉकडाऊन रविवारपासून शिथिल होऊन मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने उघडण्याला परवानगी असल्याने मांसाहारींची प्रतिक्रिया “हुश्‍श… अखेर आखाड साजरा करता येणार’ अशी आली  वास्तविक आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार म्हणजे मांसाहारींसाठी पर्वणीच असते. मटण, चिकन, अंडी, मासे यावर मस्त ताव मारत जंगी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. वास्तविक हा संपूर्ण महिनाच मांसाहाराच्या “आखाड पार्ट्यां’ना जोर असतो. कडक लॉकडाऊनमध्ये आखाड पार्ट्यांनाही “लॉक’ बसला; परंतु पाच दिवसांनी तो जेव्हा उघडणार आहे तेव्हा एक तरी रविवार “गटारी’ साजरी करण्यासाठी मिळणार असल्याचा आनंद मांसाहारींना झाला आहे.

रविवारी रात्रीच दर्श अमावस्या ज्याला “गटारी अमावस्या’ असे नाव पडले आहे ती सुरू होत आहे. सोमवारी रात्रीपर्यंत ती आहे आणि मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यामुळे अनेकजण अख्खा श्रावणमहिना मांसाहार पूर्ण बंद करतात. त्यांना आखाडचे प्रचंड आकर्षण असते. पुढचा संपूर्ण महिना मांसाहार करायचा नसल्याने हा एक महिना ते पुरेपूर मांसाहार कर वाइन शॉप बंदचा “गम.’ मांसाहाराबरोबर अनेकजण मद्यपानाला देखील प्राधान्य देतात; परंतु श्रावणात अनेकजण मांसाहाराबरोबर मद्यपानही करत नाहीत. मात्र, महापालिका आयुक्तांनी वाइन शॉप्स उघडण्याला परवानगी दिली नसल्याने मद्यपींमध्ये नाराजीचा सूर आहे. मांसाहार करायला मिळणार याचे “खुशी’ असली तरी वाइन शॉप बंदचा “गम’ असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे.

लॉकडाऊनमध्ये सवलत, पण नियम पाळा ः लॉकडाऊनमध्ये रविवारी महापालिकेने काही अंशी सवलत देऊन दुकाने ठराविक कालावधीसाठी सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. आखाडमुळे मटण व चिकन खरेदीसाठी झुंबड उडण्याची शक्‍यता आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून खरेदी करावी. सोशल डिस्टन्स पाळावे आणि मास्कचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये. करोना बाधितांची संख्या लक्षात घेऊन लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे.
– डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त.

Post a comment

0 Comments