पुणे अकरावी प्रवेश प्रक्रिया संबंधित कार्यशाळा.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसंबंधी कार्यशाळा

अॅग्लो उर्दू गर्लस् स्कूल चा पुढाकार


PRESS MEDIA LIVE :.  पुणे      (प्रतिनिधी) :

अॅग्लो उर्दू गर्लस् स्कूलमध्ये  अकरावी प्रवेश प्रक्रियेसंबंधी ऑनलाईन कार्यशाळा  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. झूम मीटिंग अॅप द्वारा  दहावी चे विद्यार्थी व पालक यांसाठी संस्थेच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . मुख्याध्यापिका आयेशा आरिफ शेख यांनी ही माहिती दिली. तीन सत्रात याचे आयोजन करण्यात आले होते. 
गफ्फार सय्यद, उपप्राचार्य,आबेदा इनामदार ज्युनियर काॅलेज तथा सदस्य, केंद्रीय प्रवेश समिती,पुणे यांनी विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले.

कोरोना विषाणू साथीच्या स्थिती मध्ये ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन पद्धती ने पार पडणार आहे .त्यामुळे मार्गदर्शन आवश्यक होते. ऑनलाईन फाॅर्म भरणे,  ऑनलाईन शुल्क भरने इत्यादी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले.

 26 ते 31 जुलै नोंदणी करणे,1 ऑगस्ट पासून फाॅर्म पार्ट 1 भरणे व ऑनलाईन शुल्क भरणे व निकाल जाहीर झाल्यानंतर पार्ट 2 भरणे व शाखा व इच्छित शाखा व कनिष्ठ महाविद्यालयाची निवड करणे त्याच बरोबर प्रत्यक्ष प्रवेश कसा घ्यायचा इत्यादी गोष्टींचे मार्गदर्शन करण्यात आले.

 व संस्थे चे अध्यक्ष डाॅ पी ए इनामदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेच्या अन्य शाळेत सुद्धा अशाच प्रकारे मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

...........................

Post a Comment

Previous Post Next Post