नवी दिल्ली : विड्याच्या बंडल वर इशारा नाही

विड्याच्या बंडलवर ‘इशारा’ नाही.

सरकारच्या निर्णयाचे उत्पादकांकडून स्वागत .PRESS MEDIA LIVE : 

नवी दिल्ली – केंद्र सरकारने विड्याच्या बंडलवर सचित्र आरोग्यविषयक इशारा छापण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर सिगारेटच्या होलसेल पॅकवरील सचित्र इशारा छापण्याचीही गरज नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.  यासाठी बऱ्याच कामगार संघटनांनी मागणी केली होती. सिगारेटच्या अनेक पाकिटावरील पॅकेजिंगवर चार रंगातील आरोग्यविषयक इशारा छापण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर विड्याच्या एका बंडल वरील किंवा बंडल्सच्या पॅकेजिंग वरील सचित्र इशारा छापण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विडी निर्मात्यांना आणि विड्याच्या कारखानदारांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने यासंदर्भात 21 जुलै रोजी आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे भारतीय मजदूर संघाने स्वागत केले आहे. 13 एप्रिल 2020 रोजी सचित्र इशारा छापणे बंधनकारक करण्यात आले होते. देशभरामध्ये दोन कोटी लोक विड्याच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. केंद्र सरकारने या घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचा खर्च वाचणार वाढणार होता. आता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे या क्षेत्रातील काम करणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालय व कामगार मंत्रालयाने यासाठी पाठपुरावा केल्यामुळे हे शक्‍य झाले आहे.

       विडी व्यवसाय वेगळा समजावा

एकूण तंबाखू संबंधातील व्यवसायांमध्ये विडी व्यवसायाचा समावेश केला जाऊ नये. कारण या व्यवसायातील लोक गरीब असतात. त्याचबरोबर या क्षेत्रातील उत्पादन मूल्य कमी असते. त्यामुळे इतर कंपन्यांना जे नियम लागू होतात ते नियम विडी व्यवसायाला लागू होऊ नयेत. यासाठी या व्यवसायाला एक वेगळी ओळख देण्याची गरज असल्याचे भारतीय मजदूर संघाने म्हटले आहे.

Post a comment

0 Comments