मुंबई : महाराष्ट्र राज्य 31 ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊन.

महाराष्ट्र राज्यात 31 ऑगस्ट पर्यंत लाॅकडाऊन PRESS MEDIA LIVE :.  मुंबई. :( गणेश राऊळ ) :

मुंबई : महाराष्ट्रामधील लॉकडाउनची मुदत वाढवण्यात आली असून आता ३१ ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये लॉकडाउन कायम राहणार आहे. कंटेंटमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असले तरी काही दिलासा देणारे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढवण्याची परवानगी देण्यात आली. सर्व सामान्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे, दुचाकीवर दोन जणांना प्रवास करण्यास परवानगी देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमध्ये दुचाकीवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची मूभा देण्यात आली होती. तर चारचाकी वाहनधारकांनाही दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

*काय आहेत नवे नियम*

नव्या नियमांनुसार अत्यावश्यक कामासाठी टॅक्सीने जाण्यासाठी १ अधिक तीन जणांना परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच टॅक्सीमधील एक जागा म्हणजेच मागील सीटवरील मधली जागा रिकामे असणे बंधनकारक असणार आहे. 

सरकारने १+३ अशी परवानगी टॅक्सीला दिली आहे.

 टॅक्सीप्रमाणेच रिक्षामध्येही मधली जागा रिकामी असणे बंधनकारक असणार आहे. 

रिक्षामध्ये १+२ अशी परवानगी देण्यात आली आहे.

टॅक्सीप्रमाणेच खासगी चार चाकी गाड्यांनाही १+३ अशी परवानगी देण्यात आल्याचे सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

तर या नव्या नियमांमध्ये दुचाकीस्वारांना सर्वात मोठा दिलासा मिळाला असून हेल्मट आणि मास्क घालून दुचाकीवरुन दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रवासामध्ये मास्क घालणे बंधनकारक असल्याचेही या नव्या नियमांमध्ये म्हटले आहे.

यापूर्वी राज्य सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये दुचाकीवरुनही एकाच व्यक्तीला प्रवासास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे जागोजागी नाकाबंदी असल्याने सर्व सामान्यांनी दुचाकीवरील निर्बंध शिथिल करण्याची मागणी केल्याचे पहायला मिळाले. अखेर या मागणीचा विचार करत आता दुचाकीवरुन दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Post a comment

0 Comments