मुंबई. : पवई येथे शासकीय रुग्णालय उभारावे, तर विक्रोळी कन्नमवार नगर महात्मा फुले रुग्णालयाचे

पवई येथे शासकीय रुग्णालय उभारावे तर विक्रोळी कन्नमवार नगर महात्मा फुले रुग्णालयाचे प्रलंबित कामकाज पूर्ण करा - रिपब्लिकन युवक आघाडीची मागणी

          
 
PRESS MEDIA LIVE : मुंबई  :  (  रामचंद्र राऊळ. ) :

सध्या जगभरात थैमान घातलेल्या  कोविड १९ म्हणजेच  कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव संपुर्ण जगात तसेच मुंबईतील पवई ,भांडुप विक्रोळी आणि कांजूरमार्ग या ठिकाणी देखील वाढत आहे त्याच प्रमाणे या ठिकाण तील स्थानिक लोक मिळेल त्या रोजगारावर आपले कुटुंब संभाळत असतात अशावेळी यांच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला नकळतपणे या कोविड१९  कोरोना व्हायरस ची लागन झाली तर त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी हवी तेवडी रक्कम उपलब्ध नसते, त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना मृत्यू आलिंगन घालावे लागते. जर त्यावेळी त्यांना शासकीय किंव्हा निम्म शासकीय रुग्णालयची सुविधा जर पवईत उपलब्ध झाली तर त्यांच्या कुटुंबातील कोरोना बाधित रुग्णाला मोफत उपचार घेऊन जीवदान मिळु शकते त्याच प्रमाणे विक्रोळी येथील कन्नमवार नगर मधील महात्मा जोतीराव फुले महानगरपालिका रुग्णालय ह्याचे बांधकाम आद्यापही पूर्ण झालेले नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबातील व्यक्तीला त्याचा लाभ  घेता येत नाही.जरी रुग्णालयात ओ पी डी सुविधा सुरू असली तरी मोठ्या आजारावर उपचार घेण्यासाठी त्यांना या ठिकाना वरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन उपचार घ्यावा लागतो._
     _त्यामुळे राज्यचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री व स्थानिक लोकप्रिनिधी यांनी यावर लक्ष देऊन  विक्रोळीलीत गोरगरीब आर्थिकदृष्ट्या कमकुवत नागरीकांना योग्य ती मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी माणगी रिपाइं युवक आघाडी  विक्रोळी तालुका कार्यध्यक्ष  राहुल गच्चे यांनी केली आहे._

Post a Comment

Previous Post Next Post