मुंबई :

सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी मूर्तीची उंची ठरली.
 सरकार कडून मार्गदर्शक तत्वे जाहीर.


PRESS MEDIA LIVE :  मुंबई :  (गणेश राऊळ.)

मुंबई : _महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र करोनाच्या काळात गणेशोत्सव साजरा करण्याला मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काही निर्देश घालून दिले आहेत. ज्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीची जास्तीत जास्त उंची ही चार फूट तर घरगुती गणपतीची जास्तीच जास्त उंची दोन फूट असावी असं स्पष्ट करण्यात आलं आहे.  सरकारने हे निर्देश दिले आहेत._

सरकारने काय निर्देश दिले आहेत ?

_सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. कोविड १९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश यांचे पालन करावे. सार्वजनिक गणेशत्सोवातील गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त चार फूट उंचीची असावी. घरगुती गणपतीच्या मूर्तीची उंची जास्तीत जास्त दोन फूट असावी._

Post a Comment

Previous Post Next Post