बेडकिहाळ कर्नाटक :

बेडकीहाळ ग्राम पंचायतमध्ये प्रशासकपदी एस.बनगार यांची निवड


PRESS MEDIA LIVE :  बेडकिहाळ : ( विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी )

बेडकीहाळ ग्राम पंचायत मध्ये प्रशासकपदी  एस बनगार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा बेडकीहाळ ग्राम पंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
   त्यांनी प्रशासक पदाचा अधिकार घेऊन बोलले. की कोरोना सारख्या महाभयंकर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी  उध्धोग व्यवसाय करनार्याना वेळ दिली गेली आहे. त्या वेळेतच आपला व्यवसाय करावा. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास 200 रू दंड आकारण्यात येईल असे म्हनाले. पुढे म्हनाले की गावातील साखर कारखाना, माग मशीन, व्यापार खोली यांच्या मालकांनी गेल्या काही वर्षांपासून पंचायत चा कर भरलेला नाही. त्यांना नोटीस देण्यात येणार असल्याचे सांगितले. 
      तसेच बेडकीहाळ ग्राम पंचायत मध्ये अनेक सोयी-सुविधा यांची कमतरता असल्यामुळे माझ्या प्रशासक पदावधीवर असेपर्यंत मी निधी मंजूर करुन मी पिन्याचे पाण्याची व्यवस्था करतो असे प्रशासक बनगार म्हनाले.
  त्यावेळी पी.डी.ओ. रविकांत एस, ग्रा.पं.माजी अध्यक्ष सौ. शारदा जाधव, उपाध्यक्ष विनोद वरुटे, सदस्य शंकरदादा पाटील, सचिन पाटील, आर.जी.डोमने, दादा अरदाळे, सज्जीद मुल्ला, संपत बोरगल, तात्यासाहेब केस्ते, चंद्रकांत चौगुले, प्रंशांत पाटील तसेच शिवकुमार, निकम सहायक आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments