AdSense code कुडाळ :

कुडाळ :

कुडाळ व्यापारी संघटना  व व्यापारी संतोष शिरसाठ यांच्या प्रयत्नांना यश

अखेर नगर पंचायत क्षेत्रातील कंटेनमेंट झोन संदर्भातील वाद मिटला.

100 मीटर भाग कंटेनमेंट झोन करण्यास प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दर्शवली सहमती.PRESS MEDIA LIVE :   कुडाळ : प्रतिनिधी.

कुडाळ व्यापारी संघटना व प्रशासना मधील सुरू असलेल्या वादावर आज अखेर प्रांत अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी तोडगा काढत कुडाळ मधील 800 मीटर कंटेनमेंट झोन रद्द करून भैरवाडी हा भाग 100 मीटर कंटेनमेंट म्हणून आज जाहीर केला. हा 800 मीटरचा कंटेनमेंट झोन रद्द करण्यासाठी व्यापारी संघटना अध्यक्ष संजय भोगटे व माजी शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष शिरसाठ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

कुडाळ नगरपंचायत क्षेत्रात दोन दिवसापूर्वी एक भाजी विक्रेता कोरूना पॉझिटिव आढळला होता. या भाजीविक्रेत्याचा वावर मुख्य बाजारपेठ असल्याने कुडाळ बाजारपेठ सहित हा व्यापारी राहत असलेल्या भैरवाडी येथील सर्व भाग 800 मीटर कंटेनमेंट घेऊन म्हणून प्रांताधिकारी यांनी घोषित केला होता. याच पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रशांत पारवेकर यांच्यासोबत व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व व्यापाऱ्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय भोगटे, मोबाईल व्यापारी संतोष शिरसाठ, नगराध्यक्ष ओंकार तेली, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, नगरसेवक सुनील बांदेकर तसेच स्वीकृत नगरसेवक राकेश कांदे, सुहास बल्लाळ, प्रकाश महाडेश्वर, प्रसाद बांदेकर, सुहास बांदेकर, सुनील भोगटे उपस्थित होते.


यावेळी व्यापाऱ्यांची बाजू मांडताना व्यापारी संतोष शिरसाठ म्हणाले, भैरवाडी येथील कोरणा पॉझिटिव सापडलेला रुग्ण हा जरी भाजीविक्रेता असला तरी, मागील तीन-चार महिने त्याने भाजी विक्री बंद केली होती, व तो मोलमजुरी करत होता, त्यामुळे त्या रुग्णाचा बाजारपेठेशी कोणताही संपर्क नसल्याने संपूर्ण बाजारपेठ कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करणे चुकीचे आहे. असे झाल्यास व्यापारी बांधवांचा उद्रेक होऊन प्रशासनाच्या निर्णयास व्यापारी वर्ग जुमानणार नाही अशा परिस्थितीत व्यापारी वर्गाच्या व्यवसायाचा व व काही दिवसात येणाऱ्या सणांचा विचार करता फक्त ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. त्या ठिकाणचा 100 मीटर परिसर कंटेनमेंट म्हणून घोषित करावा अशी मागणी व्यापारी संतोष शिरसाठ यांनी यावेळी केली. यावेळी संतोष शिरसाठ यांनी सांगितले की यासंदर्भात आपण खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्याशी कंटेनमेंट दोन संदर्भात चर्चा केली असून त्यांनीही जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून सदरील 800 मीटर झोन कमी करून 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन करण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या व व्यापाऱ्यांच्या भावनांचा विचार करता प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी व्यापारी संघटना अध्यक्ष संजय भोगटे व संतोष शिरसाट यांनी केली आहे.

यावेळी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेत प्रांताधिकारी पानवेकर यांनी कुडाळ बाजारपेठेचा केंद्रबिंदू मानून संपूर्ण कुडाळ बाजारपेठेच्या परिक्षेत्रात लागू केलेला 800 मीटरचा कंटेनमेंट झोन रद्द करत फक्त भैरववाडी मर्यादित 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला.

या सर्व परिस्थितीत व्यापारी वर्गाच्या बाजूने ठाम भूमिका मांडणाऱ्या व्यापारी व साहिल मोबाईलचे मालक संतोष शिरसाठ यांचे व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे.

Post a comment

0 Comments