AdSense code त्यागाचे प्रतीक. ईद- ऊल - अजाह

त्यागाचे प्रतीक. ईद- ऊल - अजाह

  त्यागाचे प्रतीक 

ईद- ऊल- अजाह

 

PRESS MEDIA LIVE.  :

इस्लामचा अर्थच मुळी आज्ञा पालन असा आहे. मानवी जीवनाला इस्लामने पूर्णता प्रदान केली आहे तसेच स्त्री व पुरुष या दोघांच्या बाबतीत समसमान व एकच दृष्टीकोन संपूर्ण जगासमोर ठेवला आहे. सर्वशक्तिमान अल्लाह आपल्या बंद्याची (दासाची) पावलोपावली परिक्षा घेतो. आपल्या दासाच्या त्यागाची, संयमाची, विवेक-निष्ठेची, कर्तव्य दक्षतेची परोपरीने तो पारख करतो.
इस्लामी सण ईद-ऊल-अजाह याचे खरे स्वरुप देहाने, मनाने सर्वशक्तिमान अल्लाहची उपासना करणे, त्याच्या ठायी संपूर्ण त्याग, संपूर्ण बलिदानाचा हा सण आहे. इस्लामचे दोनच मुख्य सण आहेत. ईद-उल-फित्र व ईदु-ऊल- अज हा पवित्र रमजान महिन्यांचे रोजे रमजान महिन्यात तर सर्वशक्तीमान अल्लाहच्या आज्ञेनुसार जिल्हेज या इस्लामी    महिन्यात त्याच्या सर्वात पवित्र अशा काबागृहाची यात्रा व कुर्बानी सर्वशक्तिमान अल्लाहला मांस अथवा रक्तात कुठली गोडी नसते तर तो त्याच्या दासाच्या सच्च्या पक्क्या नियतिची एक प्रकारे परिक्षाच घेत असतो. सर्वशक्तिमान अल्लाहने दिलेल्या आदेशानुसार त्याचा दास (बंदा) त्याचे तंतोतंत आचरण करतो की नाही? त्याने दिलेले आदेश पाळतो की नाही? हेच पाहण्याकरिता जगाचा पालन कर्ता इच्छुक असतो. ईश्वरी आज्ञे समोर नतमस्तक होणारा दास सर्वशक्तिमान अल्लाहला आवडतो.
इस्लाम धर्म कुठल्याही बाह्य सजावटीवर आधारलेला नाही तर तो माणसाला न दिसणाऱ्या अशा अदृश्य ईश्र्वराशी अध्यात्मिक संबंधावर आधारलेला आहे. एखाद्या विशिष्ट समाज गटाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी इस्लामची स्थापना झालेली नाही तर जगातील भिन्न वंशीय लोकांमध्ये आणि सर्व थरातील माणसांमध्ये जे कुणी या सर्वशक्तिमान अल्लाहचा स्विकार करुन त्याच्या पवित्र अंतिम महानतम प्रेषित हजरत मुहम्मद (स.) शी निष्ठेने राहण्याची प्रतिज्ञा करेल अशा सर्वांसाठी हा धर्म आहे. एकता समानता, रंजलेगांजलेल्यांना सामावून घेणारा विश्र्व बंधुत्वाचा महान संदेश निर्माण करणारा इस्लाम धर्म आहे व तोच त्याचा मुख्य उद्देश आहे. कर्तव्य पालनाचे खरे समाधान म्हणजेच इदोत्सव समानतेचे त्यागाचे प्रतिक म्हणजेच ईद-ऊल-अजाह चा सण.
ज्याप्रमाणे पवित्र रमजान महिन्यात रंजले गांजलेल्यांना दारिद्रयात खितपत पडलेल्यांना जकात व फित्रा देण्याचा आदेश आहे. त्याचप्रमाणे कुर्बानी केलेल्या जनावरांच्या मुखाचे तीन समान हिस्से करुन त्यातला एक हिस्सा हा समाजातील गरीब, गरजू लोकांना देणे अनिवार्य आहे. कुर्बानी केलेल्या जनावरांच्या मांसाचा एक हिस्सा गरजू, गरिब लोकांना देऊन त्यांनाही ईदच्या आनंदात सामिल करुन घेण्याचा आदेशच सर्वशक्तिमान अल्लाहाने आपल्या दासांना (बंद्यांना) दिला आहे.
सर्वशक्तिमान अल्लाहचे दूत हजरत इब्राहिम अलै. सलाम यांची अग्नीपरिक्षा त्यांने घेण्याचे ठरविले व त्यांचे एकुलते एक पुत्र हजरत ईस्माईल अलै. सलाम यांना अल्लाहच्या मार्गात कुर्बान करण्याचा आदेश दिला. सर्वशक्तिमान अल्लाहच्या म्हणजेच आपल्या पालनकर्त्याचा आदेश सीरसावध मानून हजरत इब्राहिम अलै. सलामांनी न डगमगता त्या आदेशाचे पालन केले व आपल्या पालन कर्त्यांनी घेतलेल्या अग्नी परिक्षेत विजय मिळविला हीच शुभ आठवण म्हणून इस्लामी जिलहिज महिन्याच्या १०, ११ व १२ तारखेला कुर्बानी करणे चा सर्वशक्तीमान अल्लाहने आदेश आपल्या दासांना दिला आहे. त्याच्याच आदेशावरुन कुर्बानी केली जाते मात्र आनंदाच्या या क्षणी रंजले गांजलेल्या गरीब, गरजवंतांना इस्लाम वाऱ्यावर सोडत नाही तर त्यांना ही कुर्बानीचे मांस देऊन इस्लाम ईदू-ऊल-अजहाच्या आनंदात सामील करुन घेण्यास प्रवृत्त करतो. त्यातूनच एकता, समानता, बंधुभाव समाजात वाढीस लागते ईदचा खरा आनंद उपभोगता येतो.
 *शिवश्री मुजफ्फरभाई सय्यद* 
 *कार्याध्यक्ष* 
 *अ. भा. साहित्य कलामंच* 
 *मो. नं. ९९६०३२५०५७*

Post a comment

0 Comments